जर आपल्याकडे वेळ कमी/अपुरी असेल आणि कुठल्याही गोष्टीचा (उदा. जीवनाचा, एखाद्या भावनेचा, नात्यांचा, ज्ञानाचा इ.) सार घ्यायचा असेल तर तो आपण:
- थोरा-मोठ्यांच्या/आजोबा/वृद्ध/अनुभवी माणसांच्या सान्निध्यात राहून घेऊ शकतो. आणखी कमी वेळ असेल तर
- विविध साहित्य/पुस्तके वाचून कमी वेळेत घेऊ शकतो. आणखी कमी वेळ असेल तर
- तीन तासांचे चित्रपट बघून घेऊ शकतो. आणखी कमी वेळ असेल तर
- एक एक तासांची व्याख्याने ऐकून घेऊ शकतो. आणखी कमी वेळ असेल तर
- 5-10 मिनिटांच्या (वेळ पडली तर काही निवडक) गाण्याच्या Lyrics ऐकून/वाचून घेऊ शकतो. आणखी कमी वेळ असेल तर
- एक दोन परिच्छेद असलेल्या सुविचारातून घेऊ शकतो. आणखी कमी वेळ असेल तर
- एक दोन ओळींच्या म्हणी ऐकून/वाचून घेऊ शकतो.

