गोतावळा

आपण आपल्या जन्मस्थानी जेव्हा राहत असतो तेव्हा अगदी लहान पणा पासून आपल्यासोबत अनेक कमी किंवा अधिक माणसे राहत असतात. त्यांच्याशी आपला लहानपणापासून ते आत्तापर्यंत संपर्क येत असतो आणि त्यामधून काही किंवा अधिक लोकांसोबत आपला (आणि त्यांचा सुद्धा) एक प्रकारचा जिव्हाळा निर्माण झालेला असतो – त्यामधूनच एक प्रकारचे नाते तयार झालेले असते! या नात्याला काही नाव आहे का? असे जर आपल्याला विचारले तर आपण ते नाव सांगू शकत नाही यालाच ‘मैत्री’, ‘सखा’/’सखी’, सोबती/सोबतीण असे आपण म्हणू शकतो; पण शिक्षणासाठी/जॉबसाठी/किंवा कुठल्याही कारणास्तव स्थलांतर करताना आणि परिसर सोडून जात असताना हेच नाते सोडून आपल्याला जावेसे वाटत नाही; पण नाईलाज म्हणून आपण गेलेलो असतो आणि ज्या ठिकाणी गेलेलो असतो त्या ठिकाणी मॅच होण्यासाठी आपले जवळपास सहा किंवा अधिक महीने गेलेले असतात. पण त्या ठिकाणी आपल्याला समजत नाही की नेमके काय चुकतेय? काय हरवल्यासारखे वाटतेय? पद असते, नोकरी असते, जॉब पण मिळालेला असतो, पैसा असतो, प्रॉपर्टी असते, भोवताली लोक पण असतात; पण तरीही नेमके काय कमी पडतेय? नेमक्या याच गोष्टीला ‘गोतावळा’ म्हणतात! आणि हा शब्द जेव्हा लक्षात आलेला असतो ना! तेव्हा कुठे मग माणूस

आपल्यासारखी, आपल्या विचाराची, आपल्यामध्ये मिक्स होणारे, आपल्याला मिक्स करून घेणारे, आपले सुख-दुख विचारणारे, आपल्याशी दिललगी-हसी मजाक करणारे, आपल्या आवडी-निवडी जाणणारे, …………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………… (ही लिस्ट आणखी वाढू शकते, त्यामुळे इथे थोडा स्पेस सोडत आहे)

या गोष्टींचे रहस्य जाणायला लागतो आणि असे जे जे काही लोक असतात ना! त्यांनाच आपला ‘गोतावळा’ म्हणायला लागतो. ‘गोतावळा’ म्हणजे साधारण आपल्या स्वतः च्या कुटुंबातले जे जे काही जवळचे आणि लांबचे नातेवाईक असतात त्यांची यादी; पण जीवनात हा सुद्धा एक गोतावळा असतो! तो म्हणजे तुमची गुपिते जाणणारा, तुम्हाला चहा पाजणारा, तुमच्यासोबत कुठल्याही कारणाशिवाय काही काळ बसणारा, तुमचे काय म्हणणे आहे ऐकणारा आणि ते जाणून घेणारा त्यावर (फुकटच) काहीतरी पर्याय सांगणारा; वेळ पडलीच तर खिशातून काहीतरी पैसे काढून देणारा, तुमच्यासाठी खर्च करणारा, कठीण काळामध्ये तुमच्यासाठी धावून येणारा! इत्यादि!

हाच आणि असाच ‘गोतावळा’ आपण आता प्रत्येक ठिकाणी गोळा करायला पाहिजे किंवा असायला पाहिजे ही गोष्ट आता कुठे वरीलप्रमाणे कुठल्याही कारणास्तव स्थलांतर झालेले असताना, बाहेर जॉब करीत करीत पैसे कमावित असताना आणि गरीब/श्रीमंत (रिच लाईफ स्टाइल) जगत असताना आपण शिकलेलो असतो! आणि हीच गोष्ट जाणवायला लागलेली असते!

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Scroll to Top
0
Would love your thoughts, please comment.x
()
x