ऊन-सावली

जुनी माणसं आई-वडीलांना आणि त्यांच्यानंतर थोरल्या किंवा मोठ्या (वयाने आणि मनाने सुद्धा!) एखाद्याच्या म्हणजेच मुलगा-मुलगी, लहान भाऊ-बहीण किंवा नातेवाईक किंवा जवळचे मानलेले किंवा मित्र-मैत्रीण असे कोणीतरी अशा कोणातरी एखाद्याच्या डोक्यावर असलेली सावली किंवा छप्पर असे म्हणतात. कारण अशी सावली त्या संबंधितांना (कष्टाचे, कुठल्याही त्रासाचे, कुठल्याही कठीण परिस्थितीचे) ऊन लागू देत नाही आणि असले छप्पर हे त्यांचे कायम संरक्षण करीत असते. दुर्दैवाने, असा बाप-माणूस, आई किंवा मातृ-तुल्य किंवा असा थोरला भाऊ/बहीण असलेला व्यक्ति आयुष्यातून गेला की लोक संबंधितांची ‘सावली’ गेली किंवा ‘छप्पर’ गेले आणि अशा संबंधितांचा ‘उन्हाळा’ झाला असे म्हणायला विसरत नाहीत किंवा म्हणत असतात. याच आशयाचे काही शब्द ज्यांचा गहन आणि प्रतीकात्मक अर्थ आपण घेणे खूप जरूरी, महत्वाचे आणि आपल्याच उपयोगाचे असते! असे शब्द खालीलप्रमाणे:
ऊन-पाऊस-वादळ-वारा, – आडोसा, छप्पर, सावली, ओटा,
तहान-भूक – पाणवठा, शिदोरी, डब्बा,
अडचणी, प्रश्न, समस्या, दुःख, यातना, वेदना – औषध, उत्तरे, आधार, दिलासा, समाधान.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Scroll to Top
0
Would love your thoughts, please comment.x
()
x